Thanks to my Dad & Mom.

आमची कथा

श्री भाऊ गुराम ( रामचंद्र काशीराम गुराम ) - हे माझे प्रेमळ बाबा आणि एक साधारण माणूस. मालवण तालुक्यातून छोटे गाव असलेल्या गुराम वाडी मधून मुंबईत काम करायला आले. त्यान्ही मुंबई पोलीस विभागात काम केले पण नेहमी गावासाठी चांगल काम करायची इच्छा होती. मुंबई पोलीस विभागात त्यांचे मोठे नाव होते, नायगाव पोलिस मैदानात चांगले हॉकी प्लेअर आणि एक चांगले थिएटर अभिनेता होते.

गावाचे मित्र आणि मुंबईचे मित्र, सगळ्यांना गुरामवाडीत काहीतरी चांगले काम करायची इच्छा होती. पण सामान्य परिस्थितीत जिद्द खूप मोठी होती. त्या वेळेची माहिती न घेता काम करणे सुरू केले.

गावात विहीर बांधण्यास सुरवात केली आणि कालव्यावर पूल बांधायला सुरुवात केली. त्यानंतर मुंबईतील गुरामवाडी मंडळाची नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू केली. आणि जेव्हा ते काम पूर्ण झाले तेव्हा त्यान्ही लिंगेश्वर मंदिर बांधण्यासाठी पैसे गोळा करण्यास सुरवात केली. मंदिराचा बांधकाम पूर्ण होण्यापूर्वीच श्री भाऊ गुराम यांचे निधन झाले. पण त्यानंतर सर्व समर्थक आणि मित्रांनी सर्व बाबतीत योगदान दिले आणि मंदिराचे काम पूर्ण केले. माझ्या बाबांसोबत काम केलेल्या सर्व लोकांना मनापासून धन्यवाद. जर मी एखाद्याचे नाव विसरलो तर कृपयाकरून आम्हाला कळवा.

खालील लोकांना मनापासून धन्यवाद

वरील माहिती माझा मोठा चुलत भाऊ श्री. शिवराम बाळकृष्ण गुराम यांनी दिला आहे. नावे व त्यांचे पदनाम किंवा काही चुकल्यास आम्ही दिलगीर आहोत. कृपया कोणत्याही दुरुस्तीसाठी आम्हाला कळवा.

आमचे कुटुंब

  • कै. काशीराम विश्राम गुराम - आजोबा
  • कै. कावेरी काशीराम गुराम - आजी
  • कै. बाळकृष्ण काशीराम गुराम - काका
  • कै. रुक्मिणी बाळकृष्ण गुराम - काकी
  • कै. जगन्नाथ काशीराम गुराम - काका
  • कै. लक्ष्मी जगन्नाथ गुराम - काकी
  • कै. रामचंद्र काशीराम गुराम - वडील
  • कै. सुलोचना रामचंद्र गुराम - आई
  • कै. कृष्णाबाई गोविंद परब - आत्या
  • कै. इंदूबाई नन्हू गावडे - आत्या
  • श्री. शिवराम बाळकृष्ण गुराम - चुलतभाऊ
  • श्री. आनंदी शिवराम गुराम - वहिनी
  • श्री. राजेंद्र जगन्नाथ गुराम - चुलतभाऊ
  • श्री. राजेश्वरी राजेंद्र गुराम - वहिनी
  • श्री. सुधीर रामचंद्र गुराम - भाऊ
  • श्री. सुनंदा सुधीर गुराम - वहिनी
  • श्री. राजेश रामचंद्र गुराम - भाऊ
  • श्री. रेणुका राजेश गुराम - वहिनी
  • श्री. घनशाम रामचंद्र गुराम - भाऊ
भाऊ गुरामाची मुले कुटुंबासह

माझे जीवन समर्थन

श्री. दिलीप रामचंद्र गुराम

आमचे मार्गदर्शक
मराठी